पान दोन
---------------
15215
नाशिक : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.१२ : देशाचे पहिले शिक्षणमंत्री आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्तर महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गरजू शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच शिक्षणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला अखिल भारतीय अल्पसंख्याक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आकाश छाजेड, उत्तर महाराष्ट्र प्रमुख तनवीर खान तांबोळी, अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद इब्राहिम, एनएसयूआय अध्यक्ष अल्तमश शेख, आदिवासी सेलचे अध्यक्ष संतोष ठाकूर, कोषाध्यक्ष फारूक मन्सुरी, मतीन पटेल, सेवादल अध्यक्ष धोंडिराम बोडके, निफाड तालुकाध्यक्ष युनूस शाह, कामरान खान, ॲड. नाझीम काझी, शहाबाज मिर्झा, मुश्ताक कुरेशी, सलीम तांबोळी, ताहेर शेख, अय्यान अत्तार, मोहम्मद शान, रज्जाक शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.