
संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : येथील सिन्नर थर्मल पावर प्रकल्प सुरु होण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. महाजेनको व एनटीपीसी यांनी एकत्रित तीन हजार ८०० कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर महाजनकोच्या मुंबई येथील सुरक्षा विभागाने प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. दरम्यान राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणातही प्रकल्प हस्तांतरणाचा निर्णय येत्या मार्च अखेरपर्यंत येण्याचा अंदाज आहे.