नाशिक- शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नाशिक महापालिकेला केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानांतर्गत (नॅशनल एअर पॉलिसी) ८७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या प्राप्त निधीतून महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने २० ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला; परंतु पाचपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण न झाल्याने दहा कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेर कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.