

नाशिक : शबरी आदिवासी योजनेंतर्गत जुने घर दाखवून एक लाख रुपयांचा लाभ दिल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वरचे गृहनिर्माण अभियंता रविराज चौधरी यांचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला. गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी बुधवारी (ता. १५) ही कार्यवाही केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर येथील श्रावण किसन शेवरे यांनी जुन्या घरावर जिओ टॅगिंग दाखवत घरकुलाचा लाभ घेतला.