
नाशिक : महापालिकेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरणाला अधिक विस्तारित स्वरूप देण्यात आले असून आयुक्त मनिषा खत्री यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. या निर्णयामुळे किरकोळ कामांसाठी आता विभागीय अधिकाऱ्यांना विभागप्रमुखांवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. पूर्व विभाग, पंचवटी, नाशिक रोड, सिडको, सातपूर व पश्चिम असे महापालिकेचे शहरांमध्ये सहा विभाग आहे.