नाशिक: नाशिकला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक नैसर्गिक सौंदर्ययुक्त वातावरण लाभले आहे. वातावरण अबाधित राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, प्रदूषणमुक्त व पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.