Farmer Bharat Boliz while showing the guavas in the field.
Farmer Bharat Boliz while showing the guavas in the field.esakal

Nashik Agricultural Success: सदाबहार तैवान पेरूची शेती यशस्वी! पालखेड मिरची येथील शेतकऱ्याला एक एकरात 8 लाखांचा नफा

Nashik News : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेला निफाड तालुक्यातील पालखेड मिरची येथील शेतकरी भारत बोळीज यांचा शेतीतील वेगळा प्रयोग यशस्वी झाला
Published on

लासलगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेला निफाड तालुक्यातील पालखेड मिरची येथील शेतकरी भारत बोळीज यांचा शेतीतील वेगळा प्रयोग यशस्वी झाला. सदाबहार तैवान पेरूचे एक एकर शेतातून खर्च वजा जाता त्यांना आठ लाखांचा भरघोस नफा मिळाला आहे. (Nashik Evergreen Taiwan Guava Farming Success 8 lakh profit per acre to farmers in mirchi Palkhed marathiche news)

निफाड तालुक्यात द्राक्षांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून कधी आस्मानी, तर कधी सुलतानी संकटामुळे द्राक्षशेती बेभरोसे झाल्याने शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करावा, म्हणून पालखेड मिरची येथील शेतकरी भारत बोळीज यांनी एक एकरात एक हजार सदाबहार तैवान पेरूच्या झाडांची लागवड दहा बाय, चार फुटांवर केली आहे.

सहा महिने झाडांचा विकास केला. त्यानंतर झाडांची छाटणी करत पेरूचे उत्पन्न घेण्यास सुरवात केली. एक झाडावर ६० फळे असून, प्रत्येकी एक पेरूचे फळ तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमचे असल्याने एक झाडावर २० किलोपर्यंत पेरू निघत असून, एक एकरावर सर्वसाधारण २० टनापर्यंत तैवान जातीचे पेरूचे उत्पन्न हाती येत आहे. किलोला ५० रुपये भाव मिळत आहे. त्यातून १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातून फोम आणि पिशव्यासाठी लागणार खर्च वजा केला, तर आठ लाखांचा भरघोस नफा मिळत असल्याचे शेतकरी भारत बोळीज यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Farmer Bharat Boliz while showing the guavas in the field.
Nashik Agricultural Success: दावचवाडी येथे अंध दांपत्याने फुलविली द्राक्षशेती! ‘तिमिरातून तेजाकडे’ धुमाळ दांपत्याचा संदेश

"मी प्राध्यापक होतो. कोरोनामध्ये नोकरी गेल्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अवकाळी, गारपीटीने पारंपरिक द्राक्षशेतीला फटका बसत असल्याने शेतीत वेगळा प्रयोग करावा, म्हणून सदाबहार तैवान पेरूची शेती केली. ही शेती यशस्वी झाली असून, दीड ते दोन लाखांचा खर्च करून आठ लाखांचा नफा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केल्यास नक्कीच शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते."-भारत बोळीज, शेतकरी पालखेड

Farmer Bharat Boliz while showing the guavas in the field.
Nashik Agricultural Success : शेतीला पंढरी अन्‌ कष्टाला भक्ती समजणाऱ्या शेणीतच्या उच्च शिक्षित शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com