
नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य सेविकांची भरती प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. माजी सैनिकांसाठी राखीव ८७ जागांवर उमेदवारच उपलब्ध न झाल्याने त्या जागा बिंदुनामावलीनुसार समांतर आरक्षणाच्या माध्यमातून भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना दिलासा मिळाला असून, या प्रक्रियेसाठी साधारणतः: एका आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली.