दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ज्ञानदीप अभ्यासिकेस सुमारे २५ हजारांचे ५० स्पर्धापुस्तकांची साहित्य

दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ज्ञानदीप अभ्यासिकेस सुमारे  २५ हजारांचे  ५० स्पर्धापुस्तकांची साहित्य
Published on: 
पान दोन ------------- 13424 वणी : ज्ञानदीप अभ्यासिकेस स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ५० पुस्तकांचा संच भेट देताना नाशिक येथील मित्र मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते. दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तक भेट ---------- गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून उपक्रम सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ४ : दीपावलीनिमित्त आदिवासी व ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत आनंद पोहोचविण्याच्या उपक्रमाला यंदा शैक्षणिक मदतीची जोड देत नाशिक येथील मित्रपरिवाराने वणी येथील संस्कृती नगरमधील वीर बिरसा मुंडा फाउंडेशनच्या ज्ञानदीप अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ५० पुस्तके भेट दिली. सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोलाचे साहित्य उपलब्ध झाले आहे. गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. नाशिक येथील दत्तात्रेय मदणे, सचिन घायवट, सचिन पाटील, महेंद्र झोले, सचिन ढोली, प्रथमेश गायकवाड, अनिल ससाणे, अमित आडके, दीपक मोराडे, दिनकर ठाकरे आदी मित्रांनी एकत्र येत हा उपक्रम साकारला. हा मित्रपरिवार दरवर्षी दीपावलीनिमित्त आदिवासी व ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना कपडे आणि फराळाचे पदार्थ वाटप करतो. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना केवळ सणापुरती मदत न करता त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी कायमस्वरूपी उपयोगी पडणारी भेट द्यावी, या विचारातून स्पर्धा परीक्षांच्या विविध विषयांवरील पुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र खांडवी यांनी केले. अभ्यासिकेचे संस्थापक व संचालक अभिमान बहिरम यांनी मित्रपरिवाराचे स्वागत करून या उपक्रमाबद्दल आभार मानले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रोशन समदडिया, दिगंबर पाटोळे, बाळकृष्ण शिरसाट तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.