

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे २० ते २५ डिसेंबरदरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर-२०२४ हे गृहप्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनस्थळी डोम उभारणीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (ता. १२) झाला. प्रदर्शनात दहा लाखांपासून पाच कोटींपर्यंतचे घरे, दुकान, प्लॉट, फार्महाऊस, कार्यालय, शेतजमीन, औद्योगिक प्लॉट असे सर्व रिअल इस्टेटचे पर्याय उपलब्ध राहणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.