
नाशिक : राज्य परीक्षा परिषदेतर्फे ९ फेब्रुवारी २०२५ ला होणाऱ्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत विलंब, अतिविलंब शुल्कासह अर्ज सादर करता येतील. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळण्यासाठी दर वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा होते. यात पाचवी व आठवीचे विद्यार्थी सहभागी होतात. राज्यभरात एकाच दिवशी ही परीक्षा घेतली जाते.