Fake Certificateesakal
नाशिक
Fake Birth Certificate : मालेगावातील बनावट जन्मदाखले प्रकरण; तत्कालीन तहसीलदारासह नायब तहसीलदार निलंबित
Latest Nashik News : बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली आहे.
मालेगाव : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशी व रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली आहे. मंगळवारी (ता. २१) समितीने दिवसभर येथे कागदपत्रांची तपासणी केली. कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शविता जन्मदाखले निर्गमित करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे व विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित केले आहे.