

Nashik
esakal
नाशिक: चहाच्या व्यवसायात 'बरकत' यावी म्हणून संपर्कात आलेल्या संशयित भोंदूबाबाने पीडित महिलेलाच जादूटोणा करून मारण्याची धमकी देत लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेने त्याला घरात जादूटोण्याचा दरबार भरविण्यास विरोध केला असता संशयित भोंदूबाबाने मारहाण केली. या प्रकरणी अखेर पीडितेने सायखेडा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली असून, संशयित भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.