

ashok kharat
esakal
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात याच्या ‘स्पेशल २६’ टीमने बनावट छाप्यांच्या माध्यमातून श्रीमंत व्यापाऱ्यांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड चित्रपट ‘स्पेशल २६’ मध्ये अक्षय कुमारने साकारलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याच्या कथेची आठवण करवणारी ही घटना आहे. खरात याने आपल्या प्रभावाचा वापर करत मोठ्या व्यापाऱ्यांची कथित बेकायदेशीर कमाईची माहिती गोळा केली आणि त्या आधारावर त्यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी पाठवून छापे टाकले. भीतीचे वातावरण निर्माण करून प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली प्रचंड रक्कम उकळण्यात आल्याचे उघड झाले आहे.