पान-३ मेन
------------
विभागातील १८ लाख शेतकऱ्यांना मदत
दुष्काळग्रस्तांना दिवाळीचा दिलासा : ९०३.५२ कोटी रुपये बँक खात्यावर जमा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : राज्य सरकारतर्फे नाशिक विभागातील दुष्काळग्रस्त ५२ तालुक्यांमधील १८ लाख ७ हजार ३२ पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत दिली आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल ९०३ कोटी ५२ लाखांचे अनुदान जमा करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ६४९ शेतकऱ्यांना २०८ कोटी ८२ लाखांची मदत जमा मिळाली. या मदतीमुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
नाशिक विभागात यंदा पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे विभागातील खरीप हंगाम करपला आहे. पावसाअभावी कांदा, द्राक्ष, केळी, मका, गहू, भात, सोयाबीनसारख्या प्रमुख पिकांसह इतर शेतीपिकांना फटका बसला. संकटातील या बळीराजाला दिवाळी सणासाठी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर पाच हजार रुपये जमा करण्यात येत आहे. नाशिक विभागात आतापर्यंत १८ लाख ७ हजार ३२ शेतकऱ्यांच्या बँकखात्यात ९०३ कोटी ५२ लाख रुपये जमा झाले आहेत.
--------------------
चौकट कऱणे
जिल्हानिहाय शेतकरी व मदतीची रक्कम
अहिल्यानगर ः ८ लाख ७ हजार २८४---४०३ कोटी ६४.
नाशिक ः ४ लाख १७ हजार ६४९ --- २०८ कोटी ८२.
जळगाव ः ४ लाख ८ हजार ६३५--- २०४ कोटी ३२.
धुळे ः ६५ हजार ९३०-- ३२ कोटी ९७ लाख.
नंदुरबार ः १ लाख ७ हजार ५३४--- ५३ कोटी ७७
---
कोट
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर प्रत्येकी पाच हजारांची अग्रिम मदत जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांना या मदतीतून तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानातून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये असे आदेश दिले आहेत. अन्यथा महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कठोर कारवाई केली जाईल.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
---
१६-१
जिल्ह्यातील अनुदानप्राप्त शेतकरी
बागलाण ः ४९,१०७, चांदवड ः २४, ७०८, देवळा ः २२,५४६. इगतपुरी ः १४, ३३९. कळवण ः १९, ५४५. मालेगाव ः ७१,४७८. नांदगाव ः ३५, ५७२. निफाड ः ५५, २४५. पेठ ः ६,८१७. सिन्नर ः ४७,१६६. सुरगाणा ः १०,३४१. त्र्यंबकेश्वर ः ९,१४८. येवला ः ५१, ६३७.
-------------------