
SAKAL Exclusive : पेरणी ते काढणीपर्यंत मोठी मेहनत घेऊनही त्या तुलनेत परतावा मिळत नसल्याने जिल्ह्यात तेलबिया क्षेत्रात मोठी घट होत आहे. नगदी पिकांकडे वाढलेला कल, नाविन्यपूर्ण संशोधनाचा अभाव, अत्यल्प उत्पादन आदी कारणाने शेतकऱ्यांचा तेलबिया पिकांकडे काणाडोळा होत आहे. तीळ, सूर्यफूल, करडई, खुरसणी ही पिके तर जिल्ह्यातून हद्दपार झाली की काय अशी स्थिती आहे. (Farmers are ignoring from oilseed crops due to low production )