वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’

वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’
Published on: 
NSK26H34762 नाशिक ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो फेकत राज्य शासनाचा निषेध नोंदविताना वंचितचे कार्यकर्ते. ----------- ३६-४ वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो फेकत आंदोलन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : ऐन दुष्काळात शेतमालास भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो फेकण्याची वेळ ओढवली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना पाच हजारांची तुटपुंजी मदत करत असल्याने त्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे रविवारी ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो फेकत ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. सरकारने कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचा निधी दुष्काळासाठी खर्च करावा. संपूर्ण दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी त्वरित जाहीर करावी. सर्व बाधित पिकांची हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची मोफत व सुरळीत व्यवस्था करावी. दलित आदिवासी वस्त्यांमध्ये विशेष आणि स्वतंत्र नळ योजना मंजूर करावी. सहकार, बँक आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्ती आणि वसुली बंद करण्यासाठी शासन निर्णय काढून दिलासा द्यावा. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व टॅक्स रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी, कामगार, पेंटर, कंत्राटी मजूर व तृतीयपंथी, अनाथ, एकल महिला विधवा महिला निराधार, भटके विमुक्त, कामगार मजूर, स्थलांतरितांसाठी विशेष अर्थसाहाय्य व सुरक्षा योजना राबवण्याची मागणी केली आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.