
नाशिक : शहरातील सेंट आंद्रिया चर्च, संत थॉमस चर्च, होली क्रॉस चर्चसह सर्व शहरभर नाताळ सण मेरी ख्रिसमस म्हणत जल्लोषात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त आठवड्यापासून चर्चमध्ये विविध कार्यक्रमांसह रंगरगोटी, ख्रिसमस ट्री, विद्युत रोषणाईसह आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. मंगळवारी (ता.२४) रात्री साडे नऊला प्रभू येशूच्या जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.