

FDA Conducts Massive Crackdown in Nashik District
Sakal
वणी ( नाशिक) : राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ, यांच्या मार्गदर्शनाने राज्यात विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकाने व नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मनीष सानप आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ७ व ८ जानेवारीला नाशिक जिल्ह्यात ३ प्रतिबंधित अन्न पदार्थाची कारवाई केली.