
वणी : सप्तश्रृंगी मातेचे मुळ रुप असलेल्या येथील जगदंबा मातेचे मंदिर व परिसरात धनुर्मास व शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता, शाकंभरी पौर्णिमा व भोगी असा एकत्रित आलेल्या दुग्धशर्करा योगाची पर्वणी साधत शिर्डी साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्र मंडळ व श्री सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ यांनी सुमारे १६ हजार १ दिव्यांची आरास, शोभिवंत फटाक्यांची आतिषबजी, डिजिटल फायर करून नेत्रदीपक असा दीपोत्सव साजरा केला.