esakal | Nashik | खड्डे १५ दिवसांत बुजवा, अन्यथा रामायण निवासस्‍थानासमोरच खड्डे
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे

नाशिक : खड्डे १५ दिवसांत बुजवा, अन्यथा रामायण निवासस्‍थानासमोरच खड्डे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरातील सर्व खड्डे पुढील १५ दिवसांमध्ये बुजवा, अन्यथा महापौरांचे रामायण निवासस्थान, स्थायी समितीचे सभापती आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या घरांसमोर खड्डे करू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

श्री. खैरे म्हणाले, की स्मार्ट सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या स्मार्ट नाशिकची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत गॅस पाइपलाइन, वायर्स अन्‌ पावसाळी गटार या कामांसह विविध कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत.

हेही वाचा: महाद्वार रोडवरील बॅरिकेट्स हटवण्यात येणार;पाहा व्हिडिओ

शहरातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होतात. जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिकमध्ये आले असताना महापालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यात माती व मुरूम टाकून मलमपट्टी केली. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून सर्वत्र चिखल झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. मात्र, सुस्त सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. दिवाळीचा सण जवळ येत असल्याने नाशिककर खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र, त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत असून, कमरेचे व मणक्याचे आजार उदभवू लागले आहेत.

loading image
go to top