Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Fire Accident : शहरात सातत्याने आगीच्या घटना घडत असून, यातून कोट्यवधींचा मालमत्तेची अक्षरश: राखरांगोळी होते.
fire ( file photo )
fire ( file photo )esakal

नाशिक : शहरात सातत्याने आगीच्या घटना घडत असून, यातून कोट्यवधींचा मालमत्तेची अक्षरश: राखरांगोळी होते. अग्निशमन विभागातर्फे व्यावसायिक आस्थापना, कंपन्याची ‘सेफ्टी’संदर्भातील वर्षातून दोनवेळा तपासणी करून परवाना दिला जातो. परंतु त्याचवेळी ‘इलेक्ट्रीकल ऑडिट’ करण्याकडे मात्र, या व्यावसायिक-आस्थापनांची उदासिनता असते. (Neglect of electrical audit leads to fire )

परिणामी, उन्हाळ्यात ‘इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट’मुळे भीषण आगीच्या घटनांना आयतेच निमंत्रण मिळते आहे. भीषण आगीच्या वाढत्या घटना पाहता, यापुढे इलेक्ट्रिकचा वापर अधिक असलेल्या आस्थापना-कंपन्यांना ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’ बंधनकारक करण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरवड्यामध्ये शहरात आगीच्या भीषण आगीच्या सुमारे चार ते पाच घटना घडल्या आहेत.

यात सर्वाधिक भीषण म्हणजे, खुटवडनगरमधील इलेक्ट्रॉनिक्स शोरुम असलेल्या देवाआशा शोरुमला लागलेली आग आहे. तत्पूर्वी खडकाळी येथे भल्या पहाटे एका दुकानाला आग लागली. त्यात दुचाकी वाहने मोठ्या संख्येने आगीत जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील आगीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक विजेची मागणी वाढते, त्याखालोखाल हिवाळ्यात असते. या काळातील आगीच्या घटनांमध्ये प्रामुख्याने विजेचे शॉर्टसर्किट हे प्रमुख कारण समोर येते. मोठ्या आस्थापना, कंपन्या, शोरुम्स आदींना अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठी अग्निशमन विभागाकडून वर्षातून जानेवारी आणि जुलै महिन्यांत ‘फायर सेफ्टी’ची तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाते. (latest marathi news)

fire ( file photo )
Nashik Fire Accident : वडाळा नाका येथे वाहन बाजार दुकानाला आग!

परंतु त्याचवेळी विजेचा अधिक वापर असलेल्या आस्थापना, कंपन्या, शोरुम्सकडून ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’ केले जात नाही. त्यामुळे जुनाट वायर, इलेक्ट्रिकल सर्किटस्‌, विजेचा अतिवापर यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीच्या घटना घडतात आणि त्यातून मोठ्याप्रमाणात वित्तहानी होते. यास संबंधित आस्थापना, कंपन्या, शोरुम्सची उदासिनताच कारणीभूत असल्याचे दिसून येते आहे.

२० भीषण आगी

शहरात कुठेही आगीची घटना घडली की पहिला ‘कॉल’ अग्निशमन विभागाला केला जातो. अग्निशमन दलाचे जवान जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या आगीच्या घटनांपैकी ३४ टक्के घटना या जानेवारी ते मार्च या दरम्यान घडतात. तर, वर्षभरात अग्निशमन दलाकडे ३८९ आगीचे कॉल आले असून, यातील २६२ कॉल्स हे किरकोळ आगीचे, ३५ कॉल्स मध्यम स्वरुपाच्या आगीचे तर, २० घटनांचे कॉल्स हे भीषण आगीच्या होत्या.

आगीच्या घटनांसंदर्भातील आकडेवारी

- वर्षभरात एकूण कॉल्स : १३९८

- एकूण आगीचे कॉल्स : ३८९

- नुकसानग्रस्त मालमत्ता : २० कोटी ८३ लाख ४५ हजार रुपये

- वाचलेली मालमत्ता : ५३ कोटी १७ लाख ७२ हजार रुपये

''आगीची घटना समजल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाचे प्राधान्य असते. त्यानंतर त्यामागील कारणांचा शोध घेतला जातो. ‘फायर सेफ्टी’बाबत वर्षातून दोनवेळा तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाते. त्याचप्रमाणे, व्यावसायिक आस्थापनांनी इलेक्ट्रीकल ऑडिट केले पाहिजे. त्यामुळे भविष्यातील आगीच्या दूर्घटना टाळता येऊ शकतील.''- संजय बैरागी, प्रमुख, अग्निशमन विभाग, नाशिक.

fire ( file photo )
Nashik Fire Accident : भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला लागली आग; मोठा अनर्थ टळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com