
नाशिक : नोकरदार पालकांसमोर दररोज सकाळी पडणारा यक्ष प्रश्न म्हणजे आज मुलाला शाळेत डब्याला काय द्यायचे, प्रत्येक पालकांचा कल मुलांना ‘हेल्दी टिफिन’ देण्याकडे असतो परंतु, कधी वेळेअभावी तर कधी मुलांच्या हट्टापायी मुलांना रेडी टू इट, जंक फूड, पॅकेट फूड दिले जाते. आरोग्य हीच खरी संपत्ती तर, लहानपणापासून आरोग्याची अर्थात आहाराची काळजी घेतल्यास मोठ्यापणी उद्भवणारे आजारपण टाळता येतात. नाहीतर कोवळ्या वयात ओबीसीटी पुढे त्याचेच रूपांतर रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग सारखे आजारपण तरुणपणात दिसून येतात.