
इंदिरानगर : संपूर्ण जग लहान मुलांच्या मोबाईल अतिवापरामुळे चिंतेत असताना दाऊदी बोहरा समाजबांधव मात्र अपवाद ठरले आहे. मोबाईल अतिवापरामुळे लहान मुलांना अनेक गंभीर समस्या जाणवत आहेत. याचे बालकांवरील दूरगामी दुष्परिणाम समजून घेत १६ डिसेंबरला समाजाचे ५३ धर्मगुरू डॉ. सय्यदना आलीकद्र मुफद्दल साहेब यांनी मुंबई येथे प्रवचनात १५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांनी मोबाईलपासून दूर राहण्याचा संदेश दिला आणि आदेशाची त्या क्षणापासून जगभरातील समाजबांधवांच्या कुटुंबात अंमलबजावणी सुरू झाली.