Nashik News : मातब्‍बरांकडून उमेदवारी अर्ज दाखल; पुढाऱ्यांची ‘एंट्री’

Nashik : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीत रविवार (ता. ७)चा मुहूर्त साधत अनेक मातब्‍बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
election
electionesakal

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीत रविवार (ता. ७)चा मुहूर्त साधत अनेक मातब्‍बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या मातब्‍बरांमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्‍यांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. दुसऱ्या दिवशी २५८ अर्ज विक्री झाली असून, आतापर्यंत एकूण ४२६ अर्ज विक्री झाले आहेत. कार्यकारी मंडळ २९ जणांचे असताना दाखल नामनिर्देश पत्रांची संख्या २०० झाली आहे. (five year election of educational institutes many members filed their candidature applications on Sunday )

रविवारी विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष ॲड. पी. आर. गिते, सरचिटणीस हेमंत धात्रक, ॲड. तानाजी जायभावे, माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्‍हाड यांनी अर्ज दाखल केले. अपेक्षेप्रमाणे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचीही नाईक शैक्षणिक संस्‍थेत ‘एंट्री’साठी चाचपणी केली जात असून, त्‍यांनीही अर्ज दाखल केला. उदय घुगे तसेच समाजातील ज्‍येष्ठ नेते दिवंगत तुकाराम दिघोळे यांचे पुत्र अभिजित दिघोळे यांनीही उमेदवारी अर्ज करताना दावेदारी सादर केली आहे.

नामनिर्देशन दाखल करण्याच्‍या प्रक्रियेला शनिवारी (ता. ६) सुरवात झालेली असताना, दुसऱ्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले. अनेक मातब्‍बरांनी रविवारचा व ‘७’ तारखेचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. माघारीनंतरच उमेदवार नेमक्या कुठल्‍या पदावर निवडणूक लढवतील, हे स्‍पष्ट होऊ शकणार आहे. दरम्‍यान, सध्या दाखल झालेल्‍या अर्जांमधील नावांकडे पाहता यंदाची निवडणूक अत्‍यंत चुरशीची होणार असल्‍याची शक्‍यता वाढलेली आहे. (latest marathi news)

election
Nashik News : स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या परिसरात मनाई आदेश लागू! परीक्षा केंद्रांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

आतापर्यंतची स्‍थिती अशी ः

एकूण अर्ज विक्री ः ४२६

एकूण अर्ज दाखल ः २००

अध्यक्षपदासाठी ः ७

सरचिटणीसपदासाठी ः ७

सहचिटणीसपदासाठी ः ८

उपाध्यक्षपदासाठी ः १०

विश्वस्त ६ जागांसाठी ः ४१

महिला राखीव जागांसाठी ः ९

election
Nashik News : इंजिनिअर युवकाचा दुग्ध प्रकिया प्रकल्प लोकप्रिय! कृषि विभागाचे मार्गदर्शन

निफाडमधून इच्‍छुक सर्वाधिक...

कार्यकारिणी सदस्यांकरिता निफाडच्‍या तीन जागांसाठी सर्वाधिक २७ इच्‍छुकांनी अर्ज भरले आहेत. त्‍यापाठोपाठ नाशिकच्‍या चार जागांसाठी १९, सिन्नरच्‍या तीन जागांसाठी १६, दिंडोरीच्‍या तीन जागांसाठी १४, येवल्याच्‍या दोन जागांसाठी १३, नांदगावच्‍या दोन जागांसाठी आठ अर्ज दाखल झाले आहेत.

रविवारी अर्ज दाखल केलेले

- अध्यक्षपदासाठी- हेमंत धात्रक, कोंडाजीमामा आव्‍हाड, पंढरीनाथ थोरे, अभिजित दिघोळे, ॲड. तानाजी जायभावे, पांडुरंग काकड, अशोक कराड.

- उपाध्यक्षपदासाठी- जयंत सानप, संजय नागरे, सुदाम सांगळे, उदय घुगे, संदीप फड, ॲड. पी. आर. गिते, रमेशचंद्र घुगे, बंडूनाना भाबड, सुनील पालवे.

- सरचिटणीसपदासाठी- हेमंत धात्रक, पांडुरंग काकड, उदय घुगे, अभिजित दिघोळे, बाळासाहेब सानप, कोंडाजीमामा आव्‍हाड.

- सहचिटणीसपदासाठी- सुनील पालवे, समाधान गायकवाड, बबनराव सानप, रमेशचंद्र घुगे, जयंत सानप, उदय घुगे, संजय नागरे, संदीप फड, पांडुरंग आव्‍हाड.

election
Nashik News : महामार्गावरील खड्ड्यांवर तोडगा निघण्याची आशा; आज मुंबईत बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com