कुंभमेळा ध्वजारोहण तयारीचे निर्देश

कुंभमेळा ध्वजारोहण तयारीचे निर्देश
Published on: 
मेन फोटो : H31415 ------ ध्वजारोहणाचा मुहूर्त ठरला, पण कामे जैसे थे आयुक्त सिंह यांचे मनपाला कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याची तारीख जाहीर झाली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला रामतीर्थ येथे हा सोहळा होणार आहे. मात्र, सोहळ्याच्या अवघ्या काही महिने आधी रामतीर्थ परिसरातील कामे अपूर्ण असल्याचे समोर आले असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेला तातडीने कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका आयुक्तांना ध्वजारोहण सोहळा तयारी संदर्भात पत्र सादर केले आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या पथकाने रामतीर्थ परिसराची, विशेषतः होळकर पूल ते गाडगे महाराज पूल या पट्ट्याची पाहणी केली. रामतीर्थ परिसरात अजूनही भूमिगत गटार, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणा, दगडी पायऱ्यांची दुरुस्ती व नवीन बांधकाम, दगड बसवणे आणि दुरुस्तीची कामे, विजेच्या केबल टाकण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अनेक ठिकाणी बांधकामाचा कचरा, खोदून काढलेली माती, न वापरलेले साहित्य आणि अर्धवट अवस्थेतील कामे तशीच पडून आहेत, ज्यामुळे भाविकांना अडथळा निर्माण होत आहे. ध्वजारोहण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आखाड्यांचे महंत, साधुसंत आणि हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अपूर्ण कामांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी प्राधिकरणाने पत्रात म्हटले आहे. पाहणी अहवालानुसार कार्यक्रम स्थळ पूर्णपणे तयार होण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे महापालिकेने कामाच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवावे, कामाचा वेग वाढवावा आणि पुरेसे मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करून रामकुंड परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक बनवावा, असे निर्देश पत्राच्या शेवटी देण्यात आले आहेत. ----------- आठ महत्त्वाचे निर्देश * कामे मुदतीपूर्वी पूर्ण करा : सर्व नागरी, मलनिस्सारण, पावसाळी गटार, विद्युत आणि सुशोभीकरणाची कामे ३१ ऑक्टोबर २०२६ च्या आत नव्हे, तर त्याच्या कितीतरी आधी पूर्ण करावीत. * परिसर कचरामुक्त करा : रामतीर्थ आणि तेथे येणाऱ्या सर्व प्रवेश मार्गावरील बांधकाम कचरा, मातीचे ढिगारे आणि अडथळे तात्काळ हटवावेत. * घाटांची सुरक्षित दुरुस्ती: दगडी पायऱ्या, घाट आणि दगडी बांधकामाची कामे सुरक्षित आणि मूळ वास्तूच्या सौंदर्याला साजेशी पूर्ण करावीत. * प्रकाशव्यवस्था: परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था, विद्युत यंत्रणेची चाचणी आणि खोदकामामुळे खराब झालेले रस्ते व पृष्ठभाग पूर्ववत करावेत. * स्वच्छतागृहांची सुविधा: कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आजूबाजूला स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करावी. * गर्दी व्यवस्थापन: भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिशादर्शक फलक, रस्त्यावर खुणा, बॅरिकेड्स आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी. * प्रवेश-निर्गमन आराखडा: व्हीआयपी, निमंत्रित, भाविक आणि सामान्य नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आणि सुरळीत हालचाल होण्यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचा आराखडा अंतिम करावा. * देखावा सुंदर ठेवा: मुख्य ध्वजारोहण स्थळ, व्यासपीठ आणि प्रवेश मार्गावरून दिसणारी कोणतीही अपूर्ण कामे एकतर पूर्ण करावीत किंवा तात्पुरत्या आच्छादनाने झाकून परिसर सादर करण्यायोग्य ठेवावा. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com