फोटो : H33231
....
पोलिसांची ‘रिअल टाइम’ रंगीत तालीम
ध्वजारोहण सोहळ्याच्या सुरक्षेचा आढावा; प्रत्यक्ष पाहणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक/ पंचवटी ता. २१ : ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. २१) पुन्हा रिअर टाइम रंगीत तालीम घेत, सुरक्षेचे चोख नियोजनाची पाहणी करण्यात आली. तसेच, तपोवनातील सुरक्षेचाही आढावा आयुक्तांसह पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला.
सर्व कार्यक्रमांच्या बंदोबस्ताची व प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात आली. या वेळी परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत गवळी, पंचवटीचे सहायक आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, सरकारवाड्याचे सहायक आयुक्त प्रमोद वाघ, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त माधव रेड्डी, अंबडचे सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिक रोडच्या सहायक आयुक्त अद्विता शिंदे यांच्यासह पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, युवराज पतकी, सुरेश आव्हाड, डॉ. अंचल मुदगल, प्रवीण चव्हाण, जितेंद्र सपकाळे यांच्यासह पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी व पथकांना बंदोबस्ताची माहिती देण्यात आली. या वेळी ठिकठिकाणी बॅरिकेटींगसह प्रत्यक्ष बंद करण्यात येणारे रस्ते, पर्यायी मार्ग यांचाही आढावा घेण्यात आला. तसेच, गंगाघाटावर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भाविकांना येण्यासाठीचे मार्गांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या मार्गांचीही पाहणी करण्यात आली. त्या अनुषंगाने पर्यायी मार्गांबाबत सूचनाही वाहतूक शाखेला करण्यात आल्या. दरम्यान, रविवारी (ता. २५) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला. पोलिस आयुक्त कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामतीर्थ परिसराची पाहणी करून कामांची माहिती घेतली. भाविकांची संभाव्य गर्दी, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि सुविधांबाबत आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
.....
असे आहे नियोजन
- ३० ऑक्टोबर : दुपारी ३ वाजता : सायंकाळी ४ ते ७ : नगर प्रदक्षिणा व धर्मध्वज शोभायात्रा
- ३१ ऑक्टोबर : सकाळी ११ ते दुपारी १ : रामतीर्थ परिसरात सिंहस्थ ध्वजारोहण
- ३१ ऑक्टोबर : सायंकाळी ४:३० ते ७:३० : भाजी बाजार पटांगण व रामतीर्थ परिसरात ११ हजार भाविकांची गोदा आरती