Nashik News : जलसंपदाचा पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

Nashik News : मॉन्सूनचे आगमन लवकरच होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागातर्फे सालाबादाप्रमाणे प्रादेशिक पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
Flood Control Room of Water Resources (file photo)
Flood Control Room of Water Resources (file photo)esakal

Nashik News : मॉन्सूनचे आगमन लवकरच होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागातर्फे सालाबादाप्रमाणे प्रादेशिक पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर कालावधीत सलग २४ तास हा कक्ष धरणांमधील पाण्याची स्थिती आवक व जावक याबद्दल निरीक्षणे नोंदवून निरनिराळ्या विभागांना माहिती कळविणार आहे. अशी माहिती नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिली आहे. (Flood Control Room of Water Resources)

प्रादेशिक पूर नियंत्रण कक्ष सलग तीन शिफ्ट जबाबदारी सांभाळणार आहे. यामध्ये सकाळी सहा ते दोन, दुपारी दोन ते रात्री दहा व रात्री दहा ते सकाळी सहा अशाप्रकारे दिवस रात्र उपलब्ध असणार आहे. संदेशक व शाखा अभियंता प्रत्येक शिफ्ट मध्ये पूर्ण वेळ उपस्थित असणार आहे. राज्यात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित असतो. पावसामुळे धरणाची पातळी जर अचानक वाढली तर त्याबद्दलची माहिती वेळोवेळी संबंधित विभागाला तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना ही कळविली जाते. जेणेकरून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त याबद्दल काही निर्णय घेऊ शकतील.

सकाळी आठच्या आत धरणांच्या सर्व धरणांची स्थिती याचा रिपोर्ट तयार करून सर्व संबंधित विभागांना पाठवला जाणार आहे. यात प्रामुख्याने धरणाची पातळी पाणीसाठा, सांडवा प्रवाह, रेन फॉल, कालव्याची माहिती व स्थिती टक्केवारी, इन फ्लो, एकूण किती पाणी सोडले आहे अशा प्रकारच्या माहितीचा एकत्रित रिपोर्ट रोज तयार केला जाऊन संबंधितांना कळविण्यात येतो. (latest marathi news)

Flood Control Room of Water Resources (file photo)
Nashik News : नामपूर बाजार समितीत हमालांचे आमरण उपोषण

अनेक वेळा अतिवृष्टी होऊन पूल तसेच रस्ते वाहून गेल्याच्या घटना घडतात. मुसळधार पावसानंतर बहुतांश वेळा धरणे ओसंडून वाहतात. अशा वेळी धरणातील पाणी सोडावे लागते. या सर्व गोष्टीची तत्काळ माहिती देण्याचे काम जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून केली जाते.

अपडेटची जबाबदारी अभियंत्यांची

धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग, झालेला पाऊस, पूर्ण जलसंचय पातळी व सध्याची पाणीपातळी याची माहिती वेळोवेळी अपडेट केली जाते. अतिवृष्टी, ढगफुटी तसेच धरण फुटीच्या घटनेवरही लक्ष ठेवले जाईल. अशा प्रकारची सर्व माहिती अपडेट करण्याची जबाबदारी पूर नियंत्रण कक्षातील अभियंत्याची राहणार आहे. त्यामुळे या नियंत्रण कक्षातील अभियंत्यांना पूर नियंत्रणाच्या कक्षातच राहावे लागणार आहे.

Flood Control Room of Water Resources (file photo)
Nashik ZP News : ग्रामसेवक युनियन असहकार आंदोलनावर ठाम; आंदोलनाबाबत संघटनांमध्ये फूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com