

नाशिक : महापालिकेत रिक्त असलेल्या जवळपास २८०० पदांबरोबरच नवीन आकृतिबंधाला मंजुरी मिळावी यासाठी प्रशासनाकडून राज्यात नव्याने सत्ता स्थापन झालेल्या सरकारकडे केला जाणार आहे. महापालिका प्रशासनावर पडणारा कामाचा ताण लक्षात घेऊन पुढील वर्षात रिक्त पदांच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत.