जिल्ह्यातील २५ हजारांहून वनदाव्यांची पुर्नपडताळणी

जिल्ह्यातील २५ हजारांहून वनदाव्यांची पुर्नपडताळणी
Published on: 
जिल्ह्यातील २५ हजारांहून वनदाव्यांची पुर्नपडताळणी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार; वनपट्टेधारकांच्या आशा पल्लवित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : जिल्ह्यातील वनहक्काच्या अपात्र दाव्यांची पुर्नपडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या पडताळणीसाठी तयारी केली असून २५ हजार ५३७ दाव्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. प्रशासन त्यासाठी उपग्रहाच्या छायाचित्रांची मदत घेणार आहे. त्यामुळे अपात्र वनपट्टेधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जल, जंगल आणि निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनहक्क कायद्यातंर्गत वनपट्टयांचे वाटप केले जाते. परंपरागत शेती कसणाऱ्या आदिवासी बांधवांना वनपट्टे वितरीत करून त्यांना समाजात सन्मानजनक जगण्याचा हक्क बहाल करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात वनहक्क पट्यांसाठी एकूण ६० हजार ७४ दावे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. प्रशासनाने पडताळणी करून तब्बल ३३ हजार ३९० दावे पात्र ठरविले. पात्र ठरलेल्या दाव्यांमध्ये लाभार्थींना २१ हजार ५७४.०६ हेक्टरचे क्षेत्र वाटप करण्यात आलेे. तर २५ हजार ५३७ दावे अपात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये कागदपत्रांची अपूर्णता व इतर तांत्रिक बाबींमुळे हे दावे फेटाळण्यात आले. आजमितीस प्रशासकीय पातळीवर ११४७ दावे प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली अपात्र दाव्यांची पुर्नपडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीवेळी संबंधित वनपट्टेधारकांना आवश्‍यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, त्यानंतरही बहुतांक्ष आदिवासी बांधवांना कागदपत्रांची पुर्तता करण्यात अडचणी येतात. हीच अडचण लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने आता सन २००६ पूर्वीची छायाचित्रे पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआरसॅटच्या त्यासाठी मदत घेतली जाणार असून त्यातून उपग्रहाची छायाचित्रे घेण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे अपात्र वनपट्टेधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तालुकानिहाय अपात्र दावे नाशिक ७४६, दिंडोरी ३०१०, पेठ २३४२, इगतपुरी १४६६, त्र्यंबकेश्‍वर २८३४, निफाड २४६, सिन्नर ४५९, येवला ३११, नांदगाव २००१, कळवण २१३९, सुरगाणा ४१४७, चांदवड १२२०, देवळा ३७२, मालेगाव २२१२, बागलाण २०२३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com