Nashik NMC News: बळी जाऊनही उपाययोजनांचा विसर! राज्याच्या गृहसचिवांनी मागितली माहिती; मनपा प्रशासनाचे धाबे दणाणले

Nashik News : महापालिका हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर अपघात झाल्यानंतर भविष्यात अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक असते
NMC News
NMC Newsesakal

नाशिक : महापालिका हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर अपघात झाल्यानंतर भविष्यात अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक असते. परंतु नाशिक महापालिकेकडून २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये १५५ अपघातात १११ जणांचा बळी जाऊनही कुठलीच उपाययोजना केल्याने राज्याच्या गृहसचिवांनी उपाययोजनांची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांमुळे महापालिकेची मोठी कोंडी झाली आहे. (Nashik Forget measures despite deaths Information sought by Home Secretary of State NMC news)

नाशिक महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ८ ऑक्टोबर २०२२ ला बस दुर्घटना होऊन १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शहर पोलिस वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यातर्फे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरात २६ ब्लॅक स्पॉट आढळले. यातील १६ ब्लॅक स्पॉट राष्ट्रीय व राज्य महामार्गावर आहे. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान महापालिका हद्दीतून नाशिक-पुणे, नाशिक- छ. संभाजीनगर, नाशिक- सुरत, मुंबई-आग्रा हे प्रमुख राज्य व राष्ट्रीय महामार्ग जातात. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अपघात झाल्यानंतर वर्षभरात अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे बंधनकारक आहे.

महापालिका हद्दीतून महामार्ग जात असेल तर महापालिकेने तसेच अन्य ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपाय योजना करणे बंधनकारक आहे. महापालिका हद्दीमध्ये अशा उपाययोजना होत नसल्याची बाब समोर आली आहे.

२९ फेब्रुवारीला राज्याच्या तत्कालीन अप्पर गृह सचिव सुजाता सोनिक यांनी रस्ते सुरक्षा समिती व नाशिक महापालिकेला पत्र पाठवून २०२० ते २०२२ या तीन वर्षाच्या कालावधीतील अपघातप्रवण क्षेत्रातील उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु नाशिक महापालिकेने अहवाल सादर केला नाही. त्यामुळे १५ एप्रिलला रस्ते सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून, अहवालाचे कागद रंगविण्याचे काम सुरू आहे.

NMC News
Nashik NMC News : रस्ता खोदकामात केबल तुटल्यास बदलण्याची जबाबदारी ठेकेदाराची!

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील तीन वर्षातील अपघात

ब्लॅक स्पॉट तीन वर्षातील अपघात मृत्यू

आडगाव ट्रक टर्मिनल्स ९ ९

शिंदेगाव शिवार १० ५

द्वारका सर्कल २९ १८

फेम सिग्नल ७ ४

के. के. वाघ कॉलेज १२ ५

जत्रा हॉटेल चौफुली ६ २

उपनगर नाका सिग्नल ८ ३

चेहेडी गाव फाटा ७ ६

दत्तमंदिर सिग्नल ९ ७

पळसेगाव बसस्टॉप ९ ९

पाथर्डी फाटा ११ ५

हॉटेल शेरे- ए- पंजाब ८ ८

हॉटेल मिरची जंक्शन ९ १६

तारवालानगर सिग्नल ५ २

गोदावरी चौक सिग्नल ८ ५

एक्सलो पॉइंट ८ ७

एकूण १५५ ११

NMC News
Nashik NMC News : मृत जनावरांमुळे होणाऱ्या रोगराई, दुर्गंधीला आळा! मार्चमध्ये 857 प्राण्यांवर शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com