
नाशिक : मागच्या वेळेस मी आणि राहुल ढिकले दोघेच लढलो होतो. आता मी आणि राहुल ढिकले दोघेही एकत्र आहोत. उत्तर महाराष्ट्रात ढिकले हे सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होतील, असा दावा माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला. ॲड. ढिकले यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात जोरदार कामे केली आहे म्हणून त्यांना पुन्हा संधी दिली पाहिजे. म्हणून आम्ही दोघे एकत्र बसलो. अनेकांनी मला लढविण्याचा प्रयत्न केला. (Former MLA Balasaheb Sanap claims that Dhikle will win East Assembly Constituency with maximum number of votes)