Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituencyesakal

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात चारही वेळा मतदानात वाढ!

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. स्थापनेपासूनच मतदारांमध्ये कमालीचा उत्साह असल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट होते.
Published on

Nashik News : अनुसूचित जमाती या घटकांसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी कायम वाढती राहिली आहे. यावरुन आदिवासी बहुल मतदारांचा उत्साह कायम असल्याचे दिसून येते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. स्थापनेपासूनच मतदारांमध्ये कमालीचा उत्साह असल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट होते. (Four times increase in voting in Dindori Constituency)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, अवघे एक टक्का वाढ झाली. गत पंचवार्षिकमध्ये दिंडोरीत मतदानाची टक्केवारी ६५.६५ इतकी होती, तर यंदा ६६.७५ टक्के इतके मतदान झाले.

१९५१ पासून २००४ पर्यंत मालेगाव या अनुसूचित जमाती मतदारसंघाच्या एकूण १४ लोकसभेच्या निवडणुका झाल्या. २००९ नंतर दिंडोरी स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला आणि मतदारसंघाची यंदाची चौथी निवडणूक पार पडली. २००९ पासून या मतदारसंघात झालेल्या मतदानाचा टक्का हा वाढतच गेला आहे. (latest marathi news)

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी यंदा तरी शरद पवार यांना तारणार का? 3 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपयश

वर्ष......उमेदवारांची संख्या.....मतदानाची टक्केवारी

२००९.........०९.......................४७.५७

२०१४...........११.......................६३.४१

२०१९..........८.........................६५.६५

२०२४..........१६.......................६६.७५

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : शरद पवार की अजित पवारांना दिंडोरी देणार कौल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com