
Nashik Fraud Crime : देवळाली गाव शिवारात जन्मदात्या आईच्या नावावर असलेल्या प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून त्यावर खोट्या सह्या करीत स्वत:च्या नावावर करून घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लक्ष्मण हरिभाऊ गांगुर्डे (रा. सामनगाव रोड, सिन्नर फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मुलगी अर्चना संजीवन खराडे (४०), संजीवन प्रकाश खराडे (५२), विश्वेश संजीवन खराडे (१८, सर्व रा. उत्कर्ष पॅलेस, त्रिमूर्ती चौक, सिडको), संजय तुळशीराम गाडेकर (रा. गाडेकर मळा, सिन्नर फाटा) यांनी संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. (Fraud of mother by daughter by fake documents )