Nashik Fraud Crime News : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून गंडविले; गंगापूर रोड परिसरातून संशयिताला अटक

Crime News : पदवीधर मुलाला रेल्वे विभागात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने एकाला सुमारे १६ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे
Fraud Crime
Fraud Crimeesakal

नाशिक : पदवीधर मुलाला रेल्वे विभागात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने एकाला सुमारे १६ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयिताला गंगापूर रोड परिसरातून अटक केली असून, त्यास न्यायालयाने १७ तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nashik Fraud Crime scammed by luring job in Railways news)

योगेश वसंतराव मोरे (रा. कुसुमप्रेम अपार्टमेंट, सहदेवनगर, गंगापूर रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. विजय दत्तात्रय थिगळे (रा. मोदकेश्वर कॉलनी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा बी.कॉम पदवीधर असून तो बेरोजगार आहे. तर, थिगळे हे दर गुरुवारी गंगापूर रोड परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात जात.

त्याठिकाणी त्यांची संशयित मोरे याच्याशी ओळख झाली. त्याने त्यांच्या मुलास रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. आत्तापर्यंत अनेकांना नोकरीला लावल्याचे त्याने काही कागदपत्रे दाखविले. त्यामुळे थिगळे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानुसार संशयिताने मागितले त्याप्रमाणे थिगळे यांनी स्वत:च्या व पत्नी वेदश्री थिगळे यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी ऑनलाईन तर कधी रोख असे १६ लाख १५ हजार ३०० रुपये दिले आहेत.

पैसे दिल्यानंतरही वर्षभर त्यांच्या मुलास नोकरीस लावले नाही. विचारणा केली असता संशयिताने त्यांच्या मोबाईलवर थिगळे यांच्या मुलाचे रेल्वेचे नियुक्ती पत्र, ओळखपत्र आदी कागदपत्रे दाखविले. परंतु सध्या कोरोनाचा काळ असल्याने, मी सांगेन तेव्हा जॉईन होण्यास सांगितले. त्यातही पुन्हा वर्ष गेले.   (latest marathi news)

Fraud Crime
Nashik Fraud Crime News : बनावट नंबरप्लेट वापरून पिकअपचा वापर; संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल

अखेर त्यांनी जाब विचारला असता संशयित उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी इंदिरानगर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयिताला अटक करण्यात आला असून, उपनिरीक्षक चौधरी हे तपास करीत आहेत.

घरात दडून बसला

संशयित मोरे यास अटक करण्यासाठी इंदिरानगरचे पथक सहदेवनगरमधील त्यांच्या फ्लॅटवर गेले. त्यावेळी संशयित मोरे व त्याची पत्नी घरात असतानाही त्यांनी दरवाजा उघडला नव्हता. सुमारे चार तास पोलिस तळ ठोकून होते. अखेर पोलिसांनी कि-मेकरला पाचारण केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्याच्याकडील मर्सिडीजही जप्त केली आहे. संशयिताने अनेकांना अशारितीने फसविले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Fraud Crime
Nashik Fraud Crime News : बनावट पुस्तक छापून नव्वद लाखांचा अपहार! नाशिक बाजार समितीकडून फसवणुकीची तक्रार दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com