Cyber Crimeesakal
नाशिक
Nashik Cyber Fraud : सायबर भामट्यांनी बँक मॅनेजरलाच गंडविले; शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून सव्वा कोटींची फसवणूक
Cyber Fraud : जादा परताव्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडविणाऱ्या सायबर भामट्यांनी शहरातील एका बँक मॅनेजरलाच चुना लावला आहे.
Nashik Cyber Fraud : शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडविणाऱ्या सायबर भामट्यांनी शहरातील एका बँक मॅनेजरलाच चुना लावला आहे. या मॅनेजरसह अन्य नोकरदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ३२ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी शहर सायबर पोलिसांत अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा झाला आहे. बँक मॅनेजरला शेअर मार्केटमध्ये वनटाईम गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविले. (Fraud of one Crore by showing lure of share trading )

