Agriculture Startups : पदवीधरांसाठी ॲग्रिकल्चर स्टार्ट-अप विषयी मोफत कार्यशाळा

Nashik News : कोणत्याही क्षेत्रातील पदवी पास झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर स्टार्ट-अप’ महत्त्वाच्या विषयावर मोफत कार्यशाळा शुक्रवारी रोजी के के वाघ कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजिली आहे.
Agriculture Startups
Agriculture Startupsesakal

Nashik News : सकाळ- ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी, द-फार्म आणि के के वाघ कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोणत्याही क्षेत्रातील पदवी पास झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर स्टार्ट-अप’ महत्त्वाच्या विषयावर मोफत कार्यशाळा शुक्रवारी (ता. ५) रोजी के के वाघ कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजिली आहे. (Free Workshop on Agriculture Startups for Graduates)

पदवी पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पदवीनंतर काहीतरी व्यवसाय करायचा असतो वा त्यांच्याकडे व्यवसाय संदर्भात काही नवनवीन संकल्पना असतात. त्या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणाव्यात, त्यासाठी फंडिंग कसे मिळेल याबाबत कार्यशाळेत द-फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पोपळघट आणि मुख्य कार्यपालन अधिकारी सर्वेश घंगाळे हे सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

ज्या पदवीधरांना स्टार्ट अप संदर्भात सविस्तर जाणून घ्यायचे आहे अशांसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त आहे. आपल्या स्टार्ट अप च्या आयडिया घेऊन येऊन अधिकाधिक पदवी पूर्ण केलेल्या पदवीधरांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन तीनही संस्थांकडून करण्यात आले आहे. (latest marathi news)

Agriculture Startups
Nashik News : धार्मिक क्षेत्रात राहुल गांधींच्‍या वक्‍तव्‍याचे पडसाद! प्रतिक्रियांतून संताप व्‍यक्‍त; दिले आध्यात्मिक दाखले

कार्यशाळेतील विषय:

- ॲग्री स्टार्ट-अप आयडिया

- यशस्वी केस स्टडीज

- ग्रांट आणि फंडिंगच्या संधी

- प्रेझेंटेशन आणि प्रपोजल

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ९८८१०९९७५७ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सोबत दिलेला क्यु आर कोड स्कॅन करून नाव नोंदणी करावी.

कार्यशाळा तारीख व ठिकाण : शुक्रवार, ५ जुलै, के के वाघ कृषी महाविद्यालय, सरस्वतीनगर, नाशिक

वेळ : सकाळी १० ते दुपारी एक

Agriculture Startups
Nashik Family Court : नाशिकला हवे आणखी एक कौटुंबिक न्यायालय! नाशिक बार कौन्सिलची उच्च न्यायालयाकडे मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com