
नाशिक : शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत फर्निचरसाठी चार कोटी ४० लाख रुपयांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून हे पैसे खर्च केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ३) सर्वसाधारण सभा झाली. या सभेत एकूण २८ ठराव मंजूर करण्यात आले.