
इगतपुरी : समस्त भक्तांचा व प्रत्येक परिवारातील सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचा उत्सव आता अंतिम टप्यात आला आहे. वर्षातून एकदाच येणाऱ्या गणेशोत्सवाचे मोठ्या दिमाखात आगमन होते. बघताबघता आठ दिवस उलटले आहेत. मागील शनिवारपासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे.
घरातील गणपतीची आरास तसेच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज मित्र-मैत्रिणींना शेअर केले जात आहेत. गणेशोत्सव सुरु झाल्यापासून सोशल मिडीयासह युट्युब व इतर समाज माध्यमांवर आमच्या पप्पांनी गणपती आणला, हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. (Bappa trending on Social Media)