.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
येवला : काठी-बनाट फिरविण्याचे कसरतीचे खेळ, विद्यार्थ्यांनी शहरभर मिरवणूक काढून लेझीम, झांज, दांडियाचे केलेले सादरीकरण, हलकडीचा निनाद अन गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार...अशा भावपूर्ण वातावरणात गणरायाचे येथे आगमन झाले. शहरात ७१ तर तालुक्यात ४० वर मंडळांनी बाप्पाची स्थापना केली तर घरगुती बाप्पाचे देखील अतिशय भावपूर्ण व जल्लोषात भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. (Ganeshotsav 2024 Lazeem cymbals Halkadi procession)