नाशिक- नाशिक रोड परिसरातील दोन गुन्हेगारी टोळीत भडका उडाल्यानंतर, शहरातील एका टोळीने दुसऱ्या टोळीतील एकाला कुटुंबासह संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेत धमकावणाऱ्या टोळीच्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना गंगापूर पोलिसांनी ग्रामीण हद्दीतून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांना जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सराईत गुन्हेगार तडीपार असताना त्याचा शहर व ग्रामीण हद्दीत बिनधास्त वावर असल्याचे समोर आले आहे.