Ganarai Advent Procession taken out on Sunday to the sound of traditional drums.
Ganarai Advent Procession taken out on Sunday to the sound of traditional drums.esakal

Nashik Traffic Issue : गणराय मिरवणुकीने रविवार कारंजा कोंडीत; ऐनसणासुदीत वाहतूक तासभर ठप्प

Traffic Issue : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपल्याने गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Published on

Traffic Issue : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपल्याने गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी (ता.१) सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये आगमन मिरवणूक काढली. दरम्यान, या मिरवणुकीमुळे अशोकस्तंभ, रविवार कारंजा याठिकाणी तब्बल तासभर वाहतूक कोंडी झाली. तर मेनरोडवरून धीम्यागतीने मिरवणूक जात असल्याने ऐन सणासुदीत आर्थिक भुर्दंड बसल्याने व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी होती. जुने नाशिकमधून मिरवणूक महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोडमार्गे, भद्रकालीत मिरवणुकीचा समारोप झाला. (Ganpati procession stopped traffic for hours on Sunday )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com