आया रे तुफान..!
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विकी कौशल व रश्मिका मंदाना यांचा अभिनय असलेला छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याला ए. आर. रहमान यांचे संगीत आणि ‘रग रग में आया तुफान..’ या गाण्याला वैशाली सामंत यांच्या गोड आवाजाने गाण्याने वेगळीच उंची गाठली आहे. गाण्याचे रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत. मग तेच गाणे आता ‘लाइव्ह’ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. नाशिक- ‘ही गुलाबी हवा’, ‘ऐका दाजिबा’, ‘कोंबडी पळाली’, ‘गुलाबाची कळी’, ‘पाटील आला’, ‘चम चम करता है..’ ते आत्ताच्या छावा चित्रपटातील ‘आया रे तुफान...’ अशा हिंदी-मराठी गाण्यांबरोबर इतरही प्रादेशिक भाषांमध्ये लोकप्रिय गाणी गायिलेल्या अष्टपैलू गायिका वैशाली सामंत नाशिककर श्रोत्यांना भेटायला येत आहेत.