

Kumbh Mela
esakal
नाशिक: पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव घराघरांत पडत आहे. युवा वर्ग नशेच्या अधीन होत असून, या 'जेन झी' पिढीला यातून वाचवायचे असेल तर केवळ धर्माचे आचरण कामी येणार आहे. सर्वांत प्रथम माता-पिता यांनी मार्गदर्शन करावे. त्यानंतर शिक्षक व आचार्य यांनीही मार्ग दाखवावा, तरच ही पिढी वाचेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय महामंत्री तथा मध्य प्रदेशचे माजी राज्यमंत्री महामंडलेश्वर मनमोहनदास महाराज यांनी केले.