पान-३
--------------
(कै) सूर्यवंशी स्मृती चषक
-------------
३६-३
क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदा मुलींनाही संधी
-----------
तालुकानिहाय निवड चाचणी स्पर्धा १२ नोव्हेंबरपासून
---------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२ ः येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही (कै) किशोर सूर्यवंशी स्मृती चषक आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा होत आहे. गेल्या १७ वर्षांपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये टॅलेंट सर्च मोहिमेअंतर्गत खेळाडूंची निवड चाचणी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षी प्रथमच मुलांसोबत मुलींचीही निवड चाचणी होणार आहे. येत्या १२ नोव्हेंबरपासून चाचणी सुरु होईल.
ग्रामीण भागातील होतकरू आणि गुणवान खेळाडूंना क्रिकेट क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना जिल्हा पातळीवर प्रतिनिधित्वाची संधी देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन खेळाडूंची निवड करणार आहेत. प्रत्येक खेळाडूच्या कौशल्याचे आणि कामगिरीचे सखोल निरीक्षण करून प्रत्येक तालुक्याचा १६ खेळाडूंचा अंतिम संघ निवडला जाईल. या निवड चाचणीत निवडलेल्या खेळाडूंना आंतर तालुका स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणखी पुढे संधी मिळेल. ''सकाळ प्रीमियर लीग''मध्ये सहभागी होण्याची थेट संधी खेळाडूंना उपलब्ध होणार आहे. ही संपूर्ण निवड चाचणी सर्व खेळाडूंसाठी विनामूल्य आहे.
१६-१ चौकट
निवड चाचणीचे वेळापत्रक
१२ नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वर तालुक्याची निवड चाचणी त्र्यंबकेश्वर आणि हरसूल येथे केली जाईल. सिन्नरला याच दिवशी चाचणी नियोजित आहे. १३ नोव्हेंबरला निफाडला, १४ नोव्हेंबरला नांदगाव आणि मनमाड, याच दिवशी येवला, तसेच नाशिकला द्वारका परिसरातील डीसीए मैदान येथे चाचणी होईल. १४ ला पेठ, १५ नोव्हेंबरला चांदवड तसेच इगतपुरी, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, मालेगाव, सटाणा, देवळा येथे चाचणी घेतली जाणार आहे.
-----------