नाशिकच्या पर्यावरण पुरक विकासाला चालना

नाशिकच्या पर्यावरण पुरक विकासाला चालना
Published on: 
टूडे मेन (महापौर फोटो घ्यावा) ----------- नाशिकच्या पर्यावरणपूरक विकासाला चालना हिमगौरी आडके : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडे प्रस्ताव पाठविणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : शहरातील जीवनमान सुधारताना पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी वर्ल्ड इकनॉमिक फोरमच्या ‘एस सिटीज’ या जागतिक उपक्रमात नाशिकच्या समावेशासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती महापौर हिमगौरी आडके यांनी दिली. जिनिव्हा येथील जागतिक महापौर परिषदेहून परतल्यानंतर शुक्रवारी (ता. १६) रामायण या निवासस्थानी महापौरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांचे ढोलताशा व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झाले. वर्ल्ड इकनॉमिक फोरमतर्फे ‘एस सिटीज’ अंतर्गत जगभरातील ५० हून अधिक शहरांची निवड केली जात आहे. २०२५ ते २०३० या काळात जीवनमान सुधारणे हा उद्देश आहे. २०२५ मध्ये बेंगळुरू आणि जुलै २०२६ मध्ये नवी दिल्लीची निवड झाली आहे. आता नाशिकसाठी शासन मान्यतेने प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक गुंतवणूक व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. जागतिक स्तरावर नाशिकचे नाव आणि भारतीय संस्कृती मांडण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. कुंभमेळ्याचे आयोजन, प्रथा-परंपरांची माहिती देण्यात आली. --------------------- गर्दी नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर सिंहस्थ गर्दी नियोजनासाठी तंत्रज्ञान, एआयच्या माध्यमातून मंदिरांचा इतिहास, संस्कृती जागतिक स्तरावर नेणार. ग्लोबल स्पिरिच्युअल सिटी, तंत्रज्ञानाद्वारे गोदावरी स्वच्छता, ग्लोबल स्कूल ऑफ डिप्लोमसीच्या भारतातील केंद्रामार्फत विद्यापीठ निर्मितीचे प्रयत्न होणार. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी मेट्रोसह विविध योजना राबवणार. सिंगापूरबरोबर सिस्टर सिटी कराराचा मसुदा व एसओपी तयार होणार. परिषदेत जगभरातील महापौरांना कुंभमेळ्याचे निमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com