घट सांगतेनंतर निर्माल्य थेट नदीपात्रात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Goda polution
Goda polutionesakal
Updated on

नाशिक रोड : घट सांगतेनंतर दहा दिवसांचे निर्माल्य भाविकांनी दसक, पंचक, नांदूर, मानूर येथील गोदावरीत व देवळालीगाव, विहीतगाव येथील वालदेवी नदीत, तसेच चेहेडी, कोटमागाव, सामनगाव, पळसे, येथे दारणा नदीत निर्माल्य टाकण्यात भाविक दिसत होते. यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. दसक येथील संत जनार्दन पुलावर आणि टाकळी येथील मलनिस्सारण केंद्राजवळ पुलावर दिवसभर भाविकांनी निर्माल्य टाकले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक संस्था व महापालिकेचे कार्यकर्ते नव्हते. यामुळे याला आळा बसला नाही.

पुलावरून नदीपात्रात निर्माल्य टाकण्यात आले.
पुलावरून नदीपात्रात निर्माल्य टाकण्यात आले.esakal

नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेमार्फत या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्याची गरज होती. गणेशमूर्ती विसर्जन दिवशी ज्याप्रमाणे महापालिका नदी किनारी निर्माल्य गोळा करण्यासाठी व्यवस्था होती, त्याप्रमाणे महापालिकेने गोदावरी नदी पुलावर निर्माल्य गोळा करण्यासाठी गाडी उभी करण्याची गरज आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी कोणताही सामाजिक संस्था पुढे येत नाहीत. वर्षभर नदी प्रदूषणावर बोलणारी संस्था या दिवशी गायब होतात.
महापालिकेने घंटागाडीप्रमाणे या दिवशी प्रत्येक प्रभागात निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र गाडी फिरविणे गरजेचे आहेत. तसेच, नागरिकांनी या निर्माल्याची माती बागेत टाकावी, तसेच हार फुले, व पानाचे खत म्हणून उपयोग करावा. त्यामुळे नदी प्रदूषण होणार नाही.

अनेक नागरिकांनी नदीच्या कठड्याजवळ निर्माल्य टाकले.
अनेक नागरिकांनी नदीच्या कठड्याजवळ निर्माल्य टाकले.esakal
Goda polution
Nashik : सिन्नर, निफाड तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट

''गोदावरी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती करीत आहोत. नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहेत. नागरिकांना घट सांगतेनंतरचे निर्माल्य आपल्या घरातील बागेत व कुंडी टाकावे. गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्‍यकता आहे.'' - विशाल सांगळे, सामाजिक कार्यकर्ते.

निर्माल्य कलशाची झालेली दुरावस्था
निर्माल्य कलशाची झालेली दुरावस्थाesakal
Goda polution
सणासुदीमुळे बांधकाम व्यवसायात कोट्यावधींच्या उलाढालीचे संकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com