Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

Godavari River Floods Nashik After Heavy Rain : मुसळधार पाऊस आणि गंगापूर धरणातून वाढविलेल्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापूर आला. घाट, मंदिरे पाण्याखाली गेली असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
Nashik Godavari River flood latest updates

Nashik Godavari River flood latest updates

esakal

Updated on

नाशिक : चोवीस तासांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील दुसरा महापूर (Gangapur Dam water release) आला. गंगापूर धरणातून गुरुवारी (ता. २३) दुपारनंतर पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदाकाठी सतर्कतेचा इशारा दिला असून, रामतीर्थ, सराफ बाजारात प्रशासनाकडून तातडीने व्यापाऱ्यांना हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीतून विसर्ग आणखी वाढविणार आहे. दरम्यान, पावसाने महापालिकेच्या कामकाजाची पुन्हा पोलखोल केली आहे. २४ तासांत ५५ हून अधिक ठिकाणी वृक्ष पडले, तर खोदलेल्या खड्ड्यांमुळे जागोजागी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com