Wedding Season Business: लग्नसराईमुळे खासगी वाहनचालकांना सुगीचे दिवस! देवदर्शनासाठी विविध वाहनांना दिले जाते पसंती

Nashik News : लग्न सोहळ्यानंतर देवदर्शन तसेच मे महिन्यातील पर्यटनामुळे खासगी वाहने आरक्षित झाली आहेत.
Driver
Driveresakal

मालेगाव : लग्नसराईचा धुमधडाका सर्वत्र सुरु आहे. ५ मेपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहे. लग्न सोहळ्यानंतर देवदर्शन तसेच मे महिन्यातील पर्यटनामुळे खासगी वाहने आरक्षित झाली आहेत. एसटी महामंडळाच्या विविध सवलतींमुळे अडचणीत आलेल्या खासगी वाहनचालकांना लग्नसमारंभ व पर्यटनामुळे अच्छे दिन आले आहेत.

एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराई असल्याने खासगी वाहने हाऊसफुल होती. आगामी काळातील लग्नसोहळे, देवदर्शन व पर्यटनामुळे आणखी किमान दीड महिने खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय तेजीत असणार आहे. सध्या ग्रामीण भागात ॲपेरिक्षांचा व्यवसाय वधारला आहे. लग्नाची तारीख ठरविल्यापासून अनेक नागरीकांना वऱ्हाडींना घेऊन जाण्यासाठी वाहने बुक करुन ठेवली आहेत. (Nashik golden days for private drivers news)

लग्नसराईत मंगल कार्यालय, लॉन्स, बॅन्ड, डीजे, घोडा बग्गी, पाण्याचे जार, आचारी, फेटावाले, फुलहार विक्रेते आदींचा व्यवसाय तेजीत आहे. त्याचबरोबर किराणा व कापड बाजारात विक्रमी उलाढाल होत आहे. लग्न सोहळ्यांमुळे उच्चांकी भाव असतांनाही सोने, चांदी खरेदीसाठी गर्दी होत आहे.

लग्नासाठी लागणारे सर्व सोयी सुविधांबरोबरच वऱ्हाडींसाठी वाहनांची व्यवस्था आगाऊ करावी लागत आहे. खासगी वाहनांना लग्नसराईच्या काळ्यात मोठी मागणी आहे. यात क्रुझर, तवेरा, इनोव्हा, विंगर, ट्रॅव्हल्स कार आदी वाहने बुकींग होत आहेत. छोटी वाहने १५ रुपये किलोमीटर प्रमाणे भाडे घेतात. खासगी ट्रॅव्हल्सदेखील वऱ्हाडींना ने-आण करण्यासाठी व्यस्त आहेत. लग्नसोहळ्यांमुळे खासगी वाहनांना सर्वत्र मागणी असल्याचे रवींद्र उशिरे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Driver
Nashik Wedding Ceremony : मेहंदी, हळद अन साखरपुडाही लॉन्सवर! वर-वधूच्या इच्छेखातर लग्नांची रितच बदलली

सध्या कसमादेसह खानदेशमध्ये जिवाची काहिली होणारे कडक ऊन पडत आहे. लग्नसोहळ्यांना नागरीकांना हजेरी लावावी लागत आहे. लालपऱ्या हाऊसफुल आहेत. रिक्षाचालकांना देखील लग्नसमारंभामुळे दिलासा मिळाला आहे. लग्नाच्या दाट तारखा व कडक ऊन यामुळे नागरीक रिक्षातूनच प्रवास करणे पसंत करीत आहेत. वऱ्हाडींना घेऊन जाण्यासाठी क्रुझर, टेम्पो व लक्झरी बसेसचा सर्वाधिक वापर केला जात आहे. ट्रॅक्टर व ट्रकमधून वऱ्हाडी नेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

लग्नसराईनंतर धार्मिक व पर्यटन स्थळांना शेकडो कुटुंबिय भेटी देत आहेत. यासाठी वाहनांची आगाऊ बुकींग केली जात आहे. शहरासह कसमादेतील नागरीक सप्तशृंगगड, तुळजापूर, गाणगापूर, शेगाव, कोल्हापूर, देऊ, आळंदी, पैठण, उज्जैन, ओंकारेश्‍वर, माहुरगड, गणपती पुळे, जेजुरी, शिर्डी, शनीशिंगणापूर, अष्टविनायक दर्शन, तिरुपती बालाजी आदी ठिकाणी जात आहेत. पर्यटन स्थळांमध्ये गुजरात येथील सरदार सरोवर डॅमवरील स्टॅच्यु ऑफ युनिटी, सापुतारा, वेरुळ, अजिंठा यासह राजस्थान व काश्‍मीर आदी ठिकाणी जाण्याकडे बहुतेकांचा ओढा आहे.

Driver
Men Wedding Wear : लग्नामध्ये पारंपारिक पोशाख परिधान करण्याकडे पुरूषांचा वाढतोय कल, शेरवानीला मिळतेय सर्वाधिक पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com