Nashik News : जिल्‍हाधिकारी कार्यालयात आले पायी; ‘नो व्हेइकल डे’ला प्रतिसाद

Latest Nashik News : कुणी सिटीलिंक बसने, तर कुणी सायकलवर, कुणी चालत जिल्‍हाधिकारी कार्यालय गाठले. सोमवारी (ता. ६) जिल्‍हाधिकारी कार्यालयात ‘नो व्‍हेइकल डे’ पाळण्यात आला.
No Vehicle Day
No Vehicle Dayesakal
Updated on

नाशिक : कुणी सिटीलिंक बसने, तर कुणी सायकलवर, कुणी चालत जिल्‍हाधिकारी कार्यालय गाठले. सोमवारी (ता. ६) जिल्‍हाधिकारी कार्यालयात ‘नो व्‍हेइकल डे’ पाळण्यात आला. जिल्‍हाधिकारी जलज शर्मा घरापासून चालत कार्यालयात दाखल झाले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान केल्‍याने कार्यालयात शिस्‍तीचे दर्शनही घडले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निळ्या रंगाचा शर्ट आणि गर्द जांभळ्या रंगाची पॅन्‍ट परिधान केली होती. महिला कर्मचाऱ्यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com